मराठी चित्रपटांमध्ये बॉलीवूडचे पाहुणे...

Ranbir Kapoor in Bucket List


बकेट लिस्टच्या  ट्रेलर मध्ये रणबीर कपूरची झलक बघुन सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पण एखादा बॉलीवूड स्टार मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची हीपहिलीच वेळ नसून याआधी देखील अनेक बॉलीवूड स्टार्सनी मराठीचित्रपटांमध्ये काम केले आहे. काही बॉलीवूड स्टार्सनी मराठी चित्रपटांमध्ये केवळ गाण्यापुरती उपस्थिती दर्शवली तर काहींनी अगदी ३-४मिनिटांचा Cameo करून मराठी प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. मराठी बॉक्सऑफिस अश्याच काही बॉलीवूड स्टार्सच्या नावांची यादी तुमच्यासमोर सादर करत आहे.

१.    संजीव कुमार

दस्तक, कोशिश, शोले यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपली भूमिका चोख निभावणारे संजीव कुमार यांनी 'बिजली' या मराठी चित्रपटामध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये अरुण सरनाईक, निळू फुले, विक्रम गोखले आणि जयश्री गडकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. दुर्दैवाने हा चित्रपट संजीव कुमार आणि अरुण सरनाईक यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाला होता.२.     अमिताभ बच्चन आणि जया बच्चन


बॉलीवूडची ही प्रेमळ आणि तितकीच लोकप्रिय जोडी 'अक्का' या मराठी चित्रपटाच्या एका गाण्यात झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती अमिताभ बच्चन यांचे मेकअप मॅन दीपक सावंत आणि पहलाज निहलानी यांनी केली होती. या गाण्यामध्ये अमिताभ आणि जया बच्चन महाराष्ट्रातल्या देवस्थानांचा जागर करताना दिसले होते.३.     रेखा, मौसमी चॅटर्जी आणि रती अग्निहोत्री

७० आणी ८०चं  दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रींनी मराठी चित्रपटांमध्ये लावण्या सादर केल्या होत्या. 'फटाकडी' या चित्रपटामध्ये रेखा यांनी सादर केलेली 'कुठे कुठे जायाचं हनिमूनला' ही लावणी आज देखील रसिकांना थिरकायला भाग पाडते.  मौसमी चॅटर्जी या मूळच्या कलकत्याच्या पण त्यांनीदेखील त्यांच्या मराठी चाहत्यांसाठी 'मोसंबी नारंगी' या मराठी चित्रपटामध्ये लावणी सादर केली होती. 'एक दुजे के लिये' या चित्रपटामधुन रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या रती अग्निहोत्री यादेखील 'भिंगरी' या चित्रपटामध्ये मराठमोळ्या लावणीवर थिरकल्या होत्या.४.    अनिल कपूर

 'हमाल दे धमाल' या चित्रपटामध्ये अनिल कपूर यांनी पाहुणे कलाकार म्हणून काम केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले होते तर लक्ष्मीकांत  बेर्डे आणि वर्ष उसगांवकर यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भुमीका होत्या.५.    सलमान खान

'लय भारी' या चित्रपटात सलमान ने साकारलेली मराठमोळ्या भाऊंची भूमिका कुणीच विसरू शकणार नाही. सलमानचा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चांगलाच फायदा झाला होता. 'दे धक्का' या चित्रपटाच्या Publicity Campiagn मध्ये देखील सलमान झळकला होता.६.   नसिरुद्दीन शाह

आपल्या Realistic अभिनयासाठी ओळखले जाणारे नसीरुद्दीन शाह यांनी 'देऊळ' आणि हल्लीच प्रदर्शित झालेल्या 'न्यूड' या मराठी चित्रपटांमधून वास्तववादी भूमिका साकारल्या आहेत.७.    विवेक ओबेरॉय

कंपनी, साथिया, शूटआऊट ऍट लोखंडवाला यांसारख्या चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकारणारा विवेक ओबेरॉय याने 'तिचा बाप त्याचा बाप' या मराठी चित्रपटामध्ये विशेष भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये सचिन पिळगांवकर, मकरंद अनासपुरे, मृण्मयी गोडबोले, श्रुती मराठे आणि अरुण नलावडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.८.     हृतिक रोशन

'हृदयांतर' या मराठी चित्रपटामध्ये हृतिक ने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. हृतिकने हा चित्रपट त्याच्या सोशल हॅन्डल्सवर प्रमोट देखील केला होता. या चित्रपटाद्वारे बॉलीवूडचा फेमस फॅशन डिजायनर विक्रम फडणीस यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते.९.     विद्या बालन

 'एक अलबेला' या चित्रपटामध्ये विद्या बालन हिने गीता बाली ह्यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट भगवान दादांच्या जीवनावर आधारित होता.१०.     प्रियांका चोप्रा

सध्या बॉलीवूड मध्ये आंतराष्ट्रीय ख्यातीची अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राची ओळख आहे. प्रियांका चोप्राने 'व्हेंटिलेटर' या मराठी सिनेमाची निर्मिती केली असून या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका देखील साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल सॉंग मध्ये देखील प्रियंका झळकली होती.११.     अजय देवगण

बाजीराव सिंघम हि मराठी मातीतली रांगडी भूमिका साकारणारा अजय देवगण याने 'आपला मानूस' या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका साकारून सगळ्यांनाच चकित केले. अजय देवगण याने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे.१२.   अक्षय कुमार

महेश टिळेकर दिग्दर्शित 'आधार' या मराठी चित्रपटामध्ये बॉलीवूडच्या खिलाडीने म्हणजेच अक्षय कुमारने एक महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.१३.    सनी लिओनी

'बॉइज' या मराठी चित्रपटातील  'कुठे कुठे जायाचं हनिमूनला'  या गाण्यामधून सनी लीओनी हीने आपल्या अदांनी सगळ्या प्रेक्षकांना घायाळ केलं होतं.Read Next...


Featured News

Read something similar