पडद्यामागे काम करणाऱ्या कर्मचारांसाठी "प्रशांत दामले" यांचा मदतीचा हात. वाचा संपूर्ण बातमी.

 

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 40 पार गेली असून मुंबईत एकाच मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे शाळा, कॉलेजला सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. तसेच याचा प्रभाव बॉलिवूड, मराठी आणि नाट्यसृष्टीवरही पडत आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग, प्रदर्शन रेंगाळले आहे. नाट्यव्यवसायही यामुळे संकटात सापडला आहे. मुंबई, पुण्यातील नाटकांचे शो रद्द झाल्याने कामगारांवर  बेकारीची परिस्थिती  आली  आहे.  यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. एक सच्चा नाटककार एक चांगला माणूसही असतो याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. अभिनेते, निर्माते प्रशांत दामले यांनी  नाटकाशी संबंधीत हातावर पोट असणाऱ्यांसाठी माणूसकीचा हात पुढे केला आहे. 

 

 

 

 

 

 

 करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे,  पडद्यामागे काम करणाऱ्या व्यक्तींचा रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण  झाला. यासाठी आता निर्माते, अभिनेते प्रशांत दामले धावून आले आहेत.

 

 

 

 

 

 

प्रशांत दामले यांनी नाट्यकुटुंबातल्या २३ जणांना प्रत्येकी १०,०००/- रुपये दिले. त्यामुळे तुर्तास का होईना या पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांचा प्रश्न सुटला आहे. सोशल मीडियावरही प्रशांत दामले यांच्या या कार्याचे कौतूक होत आहे. अभिनेता प्रसाद ओक आमि पुष्कर श्रोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रशांत दामले यांचे कौतूक केले आहे. दरम्यान, पुष्कर क्षोत्री यांनी शेअर केलेल्या पोस्टवर प्रशांत दामले यांनी उत्तर दिले आहे. हे माझे कर्तव्य आहे, असे प्रशांत दामले यांनी म्हटले आहे.

 

 

Tags

Read Next...


Popular News

Read something similar