नीना ताईंचा फ्रेंच सिनेमा 'नोस - अ वेड्डिंग'

Neena Kulkarni


आपल्या हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आणि मनोरंजन क्षेत्रात महत्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या नीना कुलकर्णी यांच्या 'नोस - अ वेड्डिंग' या फ्रेंच सिनेमाचं स्क्रिनिंग नुकतंच युरोपिअन युनिअन फिल्म फेस्टिवल २०१८ मध्ये पार पडलं. बेल्जियम मध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी तरुणीची गोष्ट या सिनेमामध्ये मांडली असून पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आणि पाश्चात्य जीवनशैली यावर हा सिनेमा भाष्य करतो. नीना कुलकर्णी यांनी या चित्रपटामध्ये मध्यवर्ती पात्राच्या म्हणजेच झहीराच्या आईची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा भारतामध्ये प्रदर्शित व्हावा ही नीना ताईंची इच्छा होती आणि त्यांची ही इच्छा युरोपिअन युनिअन फिल्म फेस्टिवल २०१८ द्वारे पूर्ण झाली.
'युरोपिअन युनिअन फिल्म फेस्टिवल' हा भारताच्या ११ वेगवेगळ्या शहरांमध्ये दिनांक १८ जून ते ३१ ऑगस्ट दरम्यान पार पडला. या फेस्टिवलच्या माध्यमातून प्रेक्षकांना २४ वेगवेगळ्या देशातल्या चित्रपटांचा आनंद लुटता आला. तसेच या फिल्म फेस्टिवल द्वारे प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.

'नोस - अ वेड्डिंग' या सिनेमाचं स्क्रिनिंग गोवा येथे पार पडलं. यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी नीना ताई स्वतः उपस्थित होत्या. नीना ताईंनी या चित्रपटा बद्दलच्या आठवणी त्यांच्या इन्स्टा अकाउंट वरून त्यांच्या चाहत्यांशी शेअर केल्या.


नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून नीना ताई प्रेक्षकांचं मनोरंजन करत आल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केलं आहे. वयाची साठी उलटल्यानंतरही त्या ज्या ऊर्जेने काम करत आहेत ति ऊर्जा कायम त्यांच्याबरोबर राहो आणि वेगवेगळ्या भूमिकांमधुन प्रेक्षकांबरोबरचं त्यांचं नातं अधिक दृढ होत जावो याच मराठी बॉक्स ऑफिस कडून नीना ताईंना मन:पूर्वक शुभेच्छा.Read Next...


Featured News

Read something similar