रंपाटमध्ये अभिनय आणि मला पाहून लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले असते- प्रिया बेर्डेचा खुलासा..

ABHINAY BERDE AND PRIYA BERDE

 झी स्टुडिओज निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित 'रंपाट' हा सिनेमा गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. लोकप्रिय आणि दिवंगत मराठी अभिनेते 'लक्ष्मीकांत बेर्डे' यांचा मुलगा अभिनय बेर्डे या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. तर लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे म्हणजेच अभिनय बेर्डेची आई, हे दोघे माय-लेक पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र पाहायला मिळाले. रंपाटमध्ये अभिनय सोबत काम करताना लक्ष्मीकांत बेर्डे चा भास होत असल्याची कबुली प्रिया बेर्डे यांनी दिली.


 प्रिया बेर्डे म्हणाल्या की, "अभिनय सोबत काम करताना मला लक्ष्मीकांत भास व्हायचा. त्याचे डोळे केस आणि हावभाव पाहून काही क्षण आला मला लक्ष्मीकांतची जाणीव व्हायची. लक्ष्मीकांत सोबत मी खूप चित्रपटात काम केले होते त्यामुळे मला अभिनयाला काम करताना पाहताना बऱ्याचदा लक्ष्मीकांतचे भास होत होते. उभी राहण्याची स्टाईल आणि कपड्यांचा सेन्स या दोन्ही गोष्टी अभिनयाच्या लक्ष्मीकांत सारख्याच आहेत." भाऊक आठवणींना जपत प्रिया बेर्डे पुढे म्हणाल्या की, "आज लक्ष्मीकांत असते तर त्यांना देखील मुलांना चित्रपटसृष्टीत काम करताना पाहून आनंद झाला असता. त्यांनी देखील अभिनयासोबत काम केले असते. ते असते तर मुलांचे थोडे वेगळे कौतुक झाले असते त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत सदैव आहेत. आज पंधरा वर्षे झालीत लक्ष्मीकांत यांना जाऊन पण आजही लोकांच्या मनातील त्यांचे स्थान कायम आहे."

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar