आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्स गाजवणाऱ्या भोसले सिनेमात संतोष जुवेकर आणि मनोज वाजपेयी एकत्र

SANTOSH JUVEKAR AND MANOJ BAJPAYEE

 मराठी सिनेमा, मालिका आणि नाटकांमध्ये निरनिराळ्या भूमिका साकारणारा 'संतोष जुवेकर' लवकरच आपल्या एका आशयघन चित्रपटात पाहायला मिळणार आहे. संतोष जुवेकरने साकारलेल्या बिनधास्त व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी पसंत केले आहे आणि म्हणूनच या चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत असल्याने याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या उत्सुकतेमध्ये भर टाकणारी बाब म्हणजे या सिनेमात हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने ओळखले जाणारे अभिनेते 'मनोज वाजपेयी' देखील झळकणार आहेत. यानिमित्ताने 'संतोष जुवेकर' आणि 'मनोज वाजपेयी' ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येत आहे.
 'संतोष जुवेकर' आणि 'मनोज वाजपेयी' एका हिंदी सिनेमात एकत्र झळकणार असून त्या सिनेमाचे नाव "भोसले" असे आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन 'देवाशीश मखिजा' यांनी केले आहे. खूप साऱ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाची अधिकृत निवड झाली आहे. भारतामधील 'मामी फेस्टिवल', 'धरमशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', 'केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' यासारख्या चित्रपट महोत्सवात या सिनेमाचे कौतुक झाले आहे. तसेच परदेशातील 'बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल', 'माल्टा इंडिया फिल्म फेस्टिवल', 'ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', 'रॉटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' अशा मानाच्या चित्रपट महोत्सवात या सिनेमाला गौरवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त BMO IFFSA, टोरंटो येथे ओपनिंग फिल्म म्हणून नॉर्थ अमेरिकन प्रिमियर ९ मे रोजी होणार आहे. या सर्व गोष्टींवरून हा सिनेमा उच्च दर्जाचा असल्याचा अंदाज बांधता येतो आणि म्हणूनच या सिनेमात बद्दलची उत्सुकता आणखीन वाढली आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar