भारताची राणी लक्ष्मीबाई आता झळकणार हॉलिवूडच्या पडद्यावर!

Devika Bhise Playing the character of Rani Laxmibai


भारतातील १८५७ च्या लढाईत पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव अजरामर आहे.

'झाशी ची राणी' अशी ओळख असणाऱ्या या लक्ष्मीबाईंच्या जीवनचरित्रावर 'स्वोर्डस अँड सेप्टर्स' नावाचा आंतरराष्ट्रीय सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

भारताच्या इतिहासात कोरल्या गेलेल्या या घटनेची दखल या सिनेमाद्वारे जागतिक पातळीवर घेतली जाणार 
आहे.

स्वाती भिसे यांनी सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

अभिनेत्री देविका भिसे हिने यात राणी लक्ष्मीबाईची प्रमुख भूमिका साकारली असून, अजिंक्य देव
यतीन कार्येकरनागेश भोसलेसिया पाटील आणि पल्लवी पाटील 
यांसारखी तगडी कलाकार मंडळी सुद्धा आपल्याला या चित्रपटाद्वारे बघायला मिळणार आहेत.नुकताच  स्वोर्डस अँड सेप्टर्स चा पोस्टर लाँच करण्यात आला ज्यात राणी लक्ष्मीबाईचे तेजस्वी रूप यात आपल्याला दिसून येते.
 

हा सिनेमा इंग्रजी भाषेमध्ये जरी असला तरी, यात थोड्याफार प्रमाणात मराठी आणि हिंदी भाषेचादेखील 
वापर करण्यात आला आहे. 

 चित्रपटाची निर्मिती स्वाती भिसे यांनीच केली असून, चार्ल्स सेलमोन हे सहनिर्माते आहेत. 
स्वातंत्रपूर्व भारतातील ब्रिटीश सत्ताधीशांना धाडसाने सामोऱ्या जाणा-या या रणरागिणीचा ' स्वोर्डस अँड सेप्टर्स’ ब्रिटीश सिनेमा भारताबरोबरच जगभरात लवकरच
प्रदर्शित होणार आहे.

Read Next...


Featured News

Read something similar