छत्रपती शिवाजी सिनेमाच्या शूटमधील रितेश देशमुखचे फोटोज पहा येथे...

CHATRAPATI SHIVAJI FILM

 सुपरस्टार 'रितेश देशमुख' हा "लय भारी" आणि "माऊली" या दोन मराठी सिनेमा नंतर आपल्या तिसरा मराठी सिनेमासाठी सज्ज झाला आहे. आणि हा त्याच्या आजवरच्या चित्रपटांपैकी सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. महाराष्ट्रात "छत्रपती शिवाजी महाराज" यापेक्षा दुसरा कुठला मोठा विषय असूच शकत नाही. आणि याच मोठ्या विषयावर भव्य-दिव्य असा "छत्रपती शिवाजी" हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका खुद्द "रितेश देशमुख" साकारत आहे.

  "छत्रपती शिवाजी" सिनेमाची निर्मिती देखील भव्य प्रमाणात होणार असून 'रितेश देशमुख' स्वतः या निर्मितीचा एक भाग असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक कंगोरे या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतील. यासाठी खूप मोठी स्टारकास्ट आणि बिग बजेट निश्चित करण्यात आल्याची माहिती कळते.अनेक मराठी कलाकारांचा भरणा आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही. आणि लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा देखील अपेक्षित आहे. या सिनेमाच्या लुकसाठी शूट करत असताना टिपलेला रितेश देशमुखचाहा फोटो.

 "छत्रपती शिवाजी" या सिनेमाचे दिग्दर्शन "रवी जाधव" करणार असल्याची चर्चा आहे परंतु याबाबत अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना त्यांनी याबद्दल सांगितले होते. हा भव्यदिव्य सिनेमा मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली गेली आहे. लवकरात लवकर या सिनेमाबद्दल आणखीन माहिती मिळावी हि तर प्रेक्षकांचीच इच्छा.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar