सलीम-सुलेमान आता मराठीत!

SALIM & SULAIMAN

आपल्या सगळ्यांनाच मराठी सिनेमाची ताकद माहित आहे. मराठी सिनेमांची ख्याती इतकी पसरली आहे कीहिंदीतल्या  अनेक कलाकार, गायक, संगीतकार मंडळींना मराठीत काम करायचं आहे.

सुनील शेट्टी, माधुरी दीक्षित, सलमान खान, करण जोहर, जॉन अब्राहाम, रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर, आशुतोषगोवारीकर, प्रियांका चोप्रा यांनी या आधी मराठीत काम केलं आहे.


 हिंदी चित्रपटसृष्टीतली आघाडीची  गायक-संगीतकार जोडी, सलीम-सुलेमान मर्चंट, आता मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे.

शशांक उदापूरकर दिग्दर्शित 'प्रवास' या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्तानं त्यांचा मराठी सिनेसंगीतातला प्रवाससुरू झाला आहे.

 सलीम-सुलेमान यांना सोनू निगम आणि गीतकार गुरू ठाकूर यांची साथ लाभली आहे.

सिनेमातल्या गाण्याचं रेकॉर्डिंग संपलं आहे.

'आजा नचले', 'चक दे इंडिया', 'धूम २', 'अब तक छप्पन', ‘दोस्ताना’ , 'फॅशन', 'सिंग इज किंग', 'मुझसे शादी करोगी', 'इक्बाल', 'हम तुम' यांच्यासारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटातील गाण्यांमधून सलीम-सुलेमान यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीच आहेत आता  मराठीत देखील त्यांच्या सुरांची जादू नक्कीच पसरेल अशी आम्हाला खात्री आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar