अभिनेता 'संजय नार्वेकर' झळकणार या वेबसिरीज मध्ये ...

SANJAY NARVEKAR

 अगं बाई अरेच्चा, खबरदार, येरे येरे पैसा सारखे मराठी आणि वास्तव, इंडियन सारख्या हिंदी सिनेमातून आपल्या खास शैलीतील अभिनयाने प्रेक्षकांवर मोहर उमटवणारा अभिनेता म्हणजे "संजय नार्वेकर"  त्याच्या आवाजातील दमदारपणा आणि डोळ्यातली जरब ही त्यांच्या अभिनयाची बलीस्थानं म्हणता येतील. आजवर सिनेमा आणि नाटकात संजयने खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत.  तर आता संजय नार्वेकर अभिषेक पारीखनिखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन निर्मित  यांच्या एका आगामी मराठी वेबसिरीज मधून झळकणार आहे.  या वेब सिरीजचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केले असून. यात स्मिता शेवाळेविनय येडेकरविजय गोखलेसुनील होळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा : ग्लॅमरस अभिनेत्री "सई ताम्हणकर" उचलतेय एक धाडसी पाऊल.

क्रिकेट हा आज भारतातील सर्वात लोकप्रिय असा खेळ. आयपीएल आणि 20-20 मॅचेस मुळे या खेळाच्या लोकप्रियतेला उधाण आले आहे. क्रिकेट बघतांना अनेक तरुण क्रिकेटर होण्याची स्वप्न उराशी बाळगतात. हाच विषय परंतु जरा वेगळ्या धाटणीने साकारण्यात येत आहे. क्रिकेट आणि क्रिकेटचे ग्लॅमर आज तरुणांच्या मानगुटीवर बसले आहे.  या वेब सिरीजमधून संजय नार्वेकर एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापूर्वी संजय नार्वेकरने अशा प्रकारची भूमिका आजवर केलेली नाही. या भूमिकेसाठी अर्थात त्याला थोडा अभ्यास करावा लागला, परंतु बालपण मुंबईत गेल्याने त्याला फारसे कष्ट लागले नाहीत. ती भूमिका नेमकी काय काय? कशी आहे ? यासाठी तुम्हाला वेब सिरीजची वाट बघावी लागणार आहे.

 

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात दिसणार हे दोन मराठी कलाकार.

संजय नार्वेकर सांगतो कीया वेब सिरीजच्या रूपाने मी डिजिटल विश्वात पदार्पण करतो आहे. कॅफेमराठी टीमने जेव्हा मला या वेबसिरीजची गोष्ट सांगितली तेव्हाच मला ती आवडली होती. आदित्य गावडे आणि अनुपम पुरोहित यांनी या गोष्टीला छान फुलवले आहे. मला या संपूर्ण टीमसोबत काम करतांना खूप मज्जा आली. नाटकसिनेमा नंतर सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल माध्यमात मला काम करायला मिळाले याचा मला आनंद वाटतो आहे.  

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar