नशीबाची व्याख्या सांगणारे गाणे आपल्या भेटीला

NASHIBVAAN POSTER
"टाळं जन्नतचं असो किंवा नशीबाचं, उघडण्यासाठी गरज असते एका चावीची..." या वाक्यातूनच "नशीबवान" चित्रपटाबद्दलची उत्सुकता आपोआपच ताणली जाते. कॉमेडीकिंग "भाऊ कदम" यांच्या "नशीबवान" चे पोस्टर लाँच झालं तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, की या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार...? त्याची उत्तरं कदाचित "नशीबवान" च्या ट्रेलरमध्ये मिळतात. आणि आता या सिनेमातील दुसरे गाणे "भिर भिर नजर" हे आपल्या भेटीला आले आहे. पहा हे गाणं येथे.भिर भिर नजर,
काळीज उडं...
मागं मागं मी,
माझं नशीब फुडं...
अशा काहीश्या शब्दातून नशीबाची वाख्या मांडणारे हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. गाण्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 'भाऊ कदम' म्हणजेच 'बबन' या व्यक्तिरेखेचा आणि त्याच्या कुटुंबाचा श्रीमंत होण्याच्या अर्थातच चांगला काळ दिसतो. या गाण्याचे बोल 'शिवकुमार ढळे' यांनी लिहिले असून 'सोहम पाठक' यांनी ते संगीतबद्ध केले आहे.


 

पोस्टर, ट्रेलर आणि आता गाणी पाहून चित्रपट सुद्धा तितकाच चांगला असेल यात शंका नाही. 'भाऊ कदम' यांच्यासोबत 'मिताली जगताप-वराडकर' आणि 'नेहा जोशी' या अभिनेत्री या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे  दिग्दर्शन 'अमोल वसंत गोळे' यांनी केले असून, सिनेमाचे  निर्माते 'अमित नरेश पाटील', 'विनोद मनोहर गायकवाड' आणि 'महेंद्र गंगाधर पाटील' हे आहेत. सोबतच 'प्रशांत विजय मयेकर' आणि 'अभिषेक अशोक रेणुसे' यांनी सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे. असा आगळावेगळा हा सिनेमा ११ जानेवारी २०१९ ला आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar