टकाटक सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई.. वाचा पहिल्या आठवड्याची कमाई येथे

TAKATAK FIRST WEEK BOX OFFICE COLLECTION

 

 

आजवरचा सर्वात बोल्ड आणि हॉट मराठी चित्रपट म्हणून दर्शविण्यात आलेला 'टकाटक' हा सिनेमा गेल्या शुक्रवारी म्हणजेच २८ जून २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. ट्रेलर पासून ते नंतर सॉंग पर्यंत सर्वच गोष्टींमुळे या चित्रपटाची चर्चा रंगली होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून या सिनेमाची चांगलीच हवा सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. शुक्रवारी २८ जून २०१९ ला हा सिनेमा जवळपास ३५०+ चित्रपटगृहात झळकला आणि या सिनेमाला दमदार ओपनिंग मिळाले. ५००० हून अधिक शोज मिळवलेल्या "टकाटक" या सिनेमाला पावसाचा आणि क्रिकेट मॅचचा काही प्रमाणात फटका बसला. परंतु तरीही पहिल्या आठवड्यात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

 

 

 

गेल्या शुक्रवारी ३ मराठी सिनेमा प्रदर्शित झाले आणि त्यापैकी टकाटक  सिनेमाला सर्वाधिक स्क्रीन्स मिळाले. २ मराठी आणि २ हिंदी चित्रपटांची स्पर्धा करीत टकाटक या सिनेमाने विकेंडच्या तीन दिवसात ३.०५ कोटींची कमाई केली. यानंतर देखील "टकाटक" सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचत राहिला आणि पहिल्या आठवड्यात या सिनेमाने ५.५० कोटींची कमाई केली आहे. सोशल मीडियावर देखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाऊस आणि क्रिकेट मॅच यांचा फटका बसला नसता तर कदाचित या सिनेमाने आणखीन अधिक कमाई केली असती. आतापर्यंत ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांनी या सिनेमाला पसंतीची पावती दिली आहे, आणि या गोष्टी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, अभिजीत अमकर आणि प्रणाली भालेराव यांची प्रमुख भूमिका असलेला आणि मिलिंद कावडे दिग्दर्शित हा सिनेमा तुम्हीही चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar