आणि काय हवं? च दुसरं पर्व घेऊन आलं एम एक्स प्लेयर.

वरून नार्वेकर दिग्दर्शित सहा भागाच्या वेबसिरीज मधून प्रिया बापट आणि उमेश कामत जुई आणि साकेतच्या रूपात परत भेटीला  आले आहेत. 

लग्न म्हणजे नव्या आयुष्याची नव्या अनोळखी माणसासोबतची सुरुवात. लग्नानंतरच्या आयुष्यात फार वेळ एकत्र घालवला असला तरी  आपण आपल्या जोडीदाराला पूर्णपणे ओळखणं कठीणच असत. अश्यात आयुष्यात नेहमीच काही ना काही राहिल्यासारखं वाटत, कुठेतरी एक भीती असते, तर कधी काही इच्छा अपूर्ण असतात, आपल्याला आपल्या जोडीदाराच्या काही गोष्टी माहिती नसतात पण जुई आणि साकेतचं मात्र काहीस वेगळं आहे. त्या दोघांच नातं हे प्रेम, विश्वास आणि थोड्या मस्तीने परिपूर्ण आहे. या नात्याचा गोड प्रवास  आणि काय हवं'? च्या निमित्ताने प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या एका भन्नाट  वेबसिरीजमध्ये आपण अनुभवला आहे. जुई आणि साकेत यांच्या लग्नानंतरच्या जिव्हाळ्याच्या आणि मस्तीच्या नात्याची सुवर्ण आणि गोड सफर पुन्हा कधी अनुभवायला मिळेल हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता आणि तोच दूर करायला एम एक्स प्लेअर या वेबसिरीज दुसरे पर्व घेऊन सज्ज झाल आहे. 

 

 

स्वतःला आणि दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जो घरी राहण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्या निर्णयाला मनोरंजनाची जोड मिळावी तसेच आपल्या लोकांसोबतचा हा वेळ उत्तम सत्कारणी लागावा हाच विचार करून एम एक्स प्लेअर घेऊन आलं आहे वरून नार्वेकर दिग्दर्शित ६ भागांच आणि काय हवं? सीझन २. या गोड सफरीच्या निमित्ताने प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा उलघडणार आहेत. जुई आणि साकेतच्या लग्नानंतर आयुष्यात येणाऱ्या नवीन गोष्टींचा प्रवास. लग्नानंतर नातं घट्ट होत असताना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन गोष्टींच्या या सफरीचा गोडवा प्रेक्षकांना या निमिताने अनुभवायला मिळणार आहे.

 

 

आणि काय हवं? सीझन २ च्या निमित्ताने  प्रिया बापट म्हणते " जुई आणि साकेत हे ही प्रत्येकाच्या जवळचे आहेत. ते तुमच्या आमच्यातले आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या तुमच्या ही आयुष्यात नक्कीच कोणत्या ना कोणत्या वळणावर घडल्या असतील किंवा घडतील ही" याच गोष्टीला दुजोरा देत उमेश म्हणाला "७ वर्षानंतर मी आणि प्रिया सीझन १ च्या निमित्ताने एकत्र दिसलो आहोत. आणि काय हवं ? सीझन २ लवकर आल्याने मी खुश आहे. जुई आणि साकेत ही पात्र माझ्यासाठी खूप विशेष आहेत आणि त्यांचं साधेपण माझ्या मनाला जस भावलं तस तुमच्या मनाला सुद्धा भावेल मात्र त्या सोबतच तुम्हाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य सुद्धा देईल". 

 

 

 

आणि काय हवं? सिझन २ बद्दल बोलताना वरुण नार्वेकर म्हणाला " लग्न म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव, जुई आणि साकेतच्या आयुष्यातले हेच छोटे क्षण आणि काय हवं? सीझन २ च्या निम्मिताने तुमचा समोर मांडले आहेत. मला वाटत की आंनद दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रत्येक क्षणात असतो येणाऱ्या नव्या दिवसात तो अगणित वाढत असतो हेच आम्ही या निमित्ताने सिरीजमध्ये मांडलं आहे.

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar