वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना दिल सरप्राईज......

Sonalee Kulkarni

बकुळा, अप्सरा आणि हिरकणी या दर्जेदार भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.  सध्या कलाकाराच्या विवाहाच्या बातम्या आपण वाचत आहोत.  अभिनेत्री सोनाली  कुलकर्णीच्या लग्नाच्या चर्चा कित्येक दिवसांपासून होत होत्या.  बिझनेसमन कुणाल बेनोडेकरसोबत ती लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमीही समोर आली होती. सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच  एक महत्वाची घोषणा केली आहे. सोनालीने वाढदिवसाच्या दिवशीच तिचा साखरपुडा झाला असल्याची आनंदाची बातमी सगळ्यांना दिली आहे. तिने तिच्या  सोशल मीडियावर साखरपुडयाचा खास फोटो देखील शेअर केला आहे. 

 

 

 2 फेब्रुवारी 2020 मध्ये सोनालीने कुणालसोबत साखरपुडा केला असल्याचं ती या पोस्टमध्ये म्हणतेय. तसेच आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...!!! असं देखील तीने पोस्ट मध्ये लिहले आहे. 

 

 

 

 

 

मराठी बॉक्स ऑफिसकडून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर या गोड जोडीला खूप खूप शुभेच्छा.  

 

 

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar