महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही : आमिर खानचे वक्तव्य

THACKERAY MOVIE POSTER
आपल्या एका आवाजावर महाराष्ट्र बंद करण्याची धमक असणारे आणि लाखो मराठी लोकांच्या मनात अढळ स्थान असलेले हिंदुहृदयसम्राट 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या जीवनावर आधारित "ठाकरे" हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २५ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासमोर हिंदीतील इमरान हाश्मीचा "चीट इंडिया" हा सिनेमा प्रदर्शित होणार होता परंतु निर्मात्यांशी बोलणी केल्यानंतर "चीट इंडिया" या सिनेमाने माघार घेत आपल्या सिनेमाची तारीख एक आठवडा आधी निश्चित केली. "ठाकरे" सारख्या मोठ्या सिनेमासमोर आवाहन नको म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे कळते. आणि याच निर्णयाला बॉलीवूड सुपरस्टार "आमिर खान" याने पुष्टी दिली आहे.
 नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका अनावरणाच्या सोहळ्यात पत्रकारांनी सुपरस्टार आमिर खानला "ठाकरे" सिनेमाबद्दल प्रश्न विचारला असता आमिर खान म्हणाले की, "महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठा स्टार कोणीही नाही. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यावरील सिनेमा सर्वांनाच पाहावासा वाटणार. आणि असा मोठा सिनेमा प्रदर्शित होत असताना त्यासमोर अन्य निर्मात्यांना आपला सिनेमा प्रदर्शित करावासा वाटणार नाही."

 काही दिवसांपूर्वीच चित्रपट सेनेचे सरचिटणीस शिवसैनिक 'बाळा लोकरे' यांनी फेसबुकवर "ठाकरे" सिनेमा समोर कुठलाही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही अशी पोस्ट केली होती आणि ती चर्चेचा विषय ठरली होती. आणि त्यानंतर एका आठवड्यातच "चीट इंडिया" या सिनेमाने माघार घेतल्याची अधिकृत घोषणा केली. शिवसेना खासदार संजय राऊत, याबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले की ही पक्षाची भूमिका नाही त्यामुळेच विनाकारण चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. या सर्व पार्श्वभूमीवर "ठाकरे" हा सिनेमा २५ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar