स्वप्नील जोशी का झाला भावुक? जाणून घ्या...

SWWAPNIL JOSHI

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक कलाकार हा आपापल्या परीने प्रयत्न करत असतो.

कधी नाटक, तर कधी मालिका, कधी  चित्रपट, तर कधी वेब सिरीज या माध्यमातून त्यांचे प्रयत्न चालूच राहतात.

 

हल्ली, सोशल मिडीयामुळे आपल्या प्रतिक्रिया कलाकारापर्यंत लगेच पोहोचल्या जातात आणि अनेक कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा 
देखील प्रयत्न करतात.

 आपलं एखाद्या कलाकारावर किती प्रेम आहे हे प्रेक्षक विविध पध्दतीने दाखवण्याचा प्रयत करत असतात.

 

अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

स्वप्नीलवर जिवापाड प्रेम करणारे प्रेक्षक भरपूर आहेत. त्यापैकी करुणा कदम आणि कुणाल शिंदे या चाहत्यांनी टॅटूच्या 
स्वरुपातून आपलं आपल्या लाडक्या अभिनेत्यावर असलेलं जीवापाड प्रेम दर्शवलं आहे.

 शरीरावर टॅटू काढणं हे काही सोपं नाही.  तो टॅटू आपल्या सोबत आयुष्यभर राहणार असतो आणि हे माहित असूनही करुणा आणि 
कुणाल
 यांनी टॅटू काढले यावरुन हे नक्कीच सिध्द होतं की त्यांचं स्वप्नीलवर खूपप्रेम आणि विश्वास आहे.

अर्थात हे टॅटू पाहिल्यावर, स्वप्नील जोशी भावूक झाला आणि प्रेक्षकांचे आपल्यावर इतके प्रेम आहे याची पुन्हा एकदा जाणीव त्याला झाली.

लवकरच स्वप्नील येणार आहे सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई  या त्याच्या गाजलेल्या चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन.  चित्रपटाचा टिझर
व्हायरल होत असून येत्या  डिसेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar