महाराजांच्या विचारांवर आधारित छत्रपती शासन सिनेमा लवकरच आपल्या भेटीला...

CHATRAPATI SHASAN POSTER
"छत्रपती शिवाजी महाराज" म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत. आणि त्यांचे पुण्याई आणि त्यांचे विचार म्हणजे या जनतेसाठी कोणत्याही महाग्रंथापेक्षा कमी नाहीत. महाराजांच्या याच विचारांची ओळख करून देण्यासाठी एक नवीन मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे ज्याचे नाव आहे "छत्रपती शासन". या सिनेमाचे पोस्टर नुकतेच "छत्रपती शिवाजी महाराज" यांचे वंशज खासदार 'उदयनराजे भोसले' यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले.


 धर्म, जाती, भेदभाव आणि राजकारण यांच्या नावाखाली तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या लोकांविरूद्ध डोळ्यात अंजन घालण्याचे काम हा सिनेमा करेल असा विश्वास निर्मात्यांनी दर्शवला आहे. या सिनेमात आपल्याला 'मकरंद देशपांडे', 'संतोष जुवेकर', 'किशोर कदम', 'अभिजीत चव्हाण', 'प्रशांत मोहिते', 'अनिल नगरकर' हे अभिनेते प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.‌ 


 या सिनेमाची कथा आणि संवाद 'खुशाल म्हात्रे' यांनी लिहिले असून ते स्वतः या सिनेमाचे दिग्दर्शन देखील करत आहेत. 'सायली काळे', 'धनश्री यादव', 'किरण कोरे', 'सायली पराडकर', 'रामचंद्र धुमाळ', 'विष्णू केदार', 'पराग शहा', 'राहुल बेलापुरकर' 'प्रथमेश जोशी', 'अभय मिश्रा', आणि 'मिलिंद जाधव' या नवीन कलावंतांचा अभिनय देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळेल. हा सिनेमा १५ मार्च २०१९ पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar