वेडिंगचा शिनेमा चित्रपटाला भारतासह परदेशात प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद..

WEDDING CHA SHINEMA





 संगीतकार व गायक 'डॉ. सलील कुलकर्णी' यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित वेडिंगचा शिनेमाहा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांचा अभिनय, कथा यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर पहायला मिळत आहे. प्री-वेडिंगच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या वेडिंगचा शिनेमा या चित्रपटाची हाताळणी लोकांच्या पसंतीस पडत आहे.

 











 मराठी चित्रपटप्रेमींसाठी यापेक्षा जास्त आनंदाची आणि अभिमानाची बातमी म्हणजे
वेडिंगचा शिनेमाहा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर आता परदेशातही प्रदर्शित करण्यात आला आहे. अमेरिका, इंग्लंड, दुबई, बेहरीन, जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये या चित्रपटाचे शो दाखविण्यात येत आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीने केली आहे.








 

 हलक्या-फुलक्या अंगाने फुलत जाणारा हा एक पारिवारिक चित्रपट आहे. महानगरांमध्ये व मोठ्या शहरांमध्ये परस्पर नात्यांकडे कसे पहिले जाते आणि त्या तुलनेत छोट्या शहरांमध्ये त्याचे काय महत्व असते, याचा उलगडा या प्री-वेडिंग चित्रपटातून करण्यात आला आहे. गेली काही वर्षे प्री-वेडिंग शूटची लाट आली आहे. लग्न ठरल्यानंतर एक मोठी फिल्म बनवली जाते. हे प्री-वेडिंग शूट करत असताना मुलभूत तत्वे आणि भावना व त्यातून येणारा जिव्हाळा, त्याग, प्रेम आणि ममत्व या गोष्टी सर्वत्र सारख्याच असतात हे यात दाखविण्यात आले असून हे सर्व पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.  

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar