साऊथच्या प्रेक्षकांप्रमाणे मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमाला प्राधान्य द्यावे :- ललित प्रभाकर

LALIT PRABHAKAR
गेल्या शुक्रवारी तब्बल ९ मराठी सिनेमे रिलीज झाल्यामुळे मराठी सिनेमांमध्ये स्क्रीन साठी खूप मारामार झाली. त्याचप्रमाणे हिंदी मध्ये देखील काहीसे असेच चित्र होते. आणि यात हॉलिवूडच्या एका चित्रपटाने बाकी हिंदी आणि मराठी चित्रपटांपेक्षा जास्त कमाई करत सर्वांना चकित केले. पुढील आठवड्यात "गल्ली बॉय" हा हिंदी सिनेमा आणि "आनंदी गोपाळ" हा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला मराठी सिनेमाला स्क्रीनसाठी संघर्ष करताना पाहायला मिळू शकतो.
 नुकतेच, "आनंदी गोपाळ" चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे ललित प्रभाकर यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. मराठी चित्रपटांना स्क्रीन साठी खूप संघर्ष करावा लागतो याबद्दल विचारणा केली असता ललित प्रभाकर म्हणाले की, "या परिस्थितीला प्रोडक्शन हाऊस तसेच काही लोक देखील जबाबदार आहे. साऊथ मध्येही हिंदी चित्रपट चालतात परंतु तेथील प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटलाच जास्त प्राधान्य देतात. महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहांची संख्या आधीच कमी असल्यामुळे मराठी प्रेक्षकांनी सर्वात आधी मराठी सिने मलाच प्राधान्य द्यावे असे मला वाटते."

 यावर अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, "संपूर्णता हिंदी चित्रपट पाहूच नका असे माझे म्हणणे नाही परंतु महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मराठी सिनेमा प्राधान्य दिल्यास मराठी सिनेमाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू शकतो." ललित प्रभाकरच्या या व्यक्तव्याशी सहमत असणारे मराठी प्रेक्षक नक्कीच मराठी सिनेमांना प्राधान्य देतील. बहुचर्चित असा "आनंदी गोपाळ" हा सिनेमा १५ फेब्रुवारी २०१९ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Read Next...


Popular News

Read something similar