सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेचा नवीन सिनेमा.. शाहिद कपूरच्या कबीर सिंग सोबत भिडणार

SIDDHARTH CHANDEKAR INSTA POST

 मराठी सिनेमासृष्टीमध्ये एक हँडसम आणि गुणी अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरचे नाव घेतले जाते. दोन दिवसांपूर्वी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तो दीड महिन्यासाठी लंडनला जात असल्याची पोस्ट केली होती. यानंतर इंडस्ट्रीमध्ये आणि त्याच्या फॅन्समध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चा रंगली होती. आज सिद्धार्थ चांदेकरने स्वतः याचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ चांदेकर म्हणजेच तो लंडनला निघाला आहे ते म्हणजे त्याच्या नवीन सिनेमा "मिस यू मिस्टर" साठी.‌ या सिनेमात त्याच्याबरोबर अभिनेत्री 'मृण्मयी देशपांडे' झळकणार आहे. 


 सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सिनेमाची घोषणा पोस्टाद्वारे केली आहे. लंडन असो किंवा पुणे प्रेम म्हणजे प्रेम असतं, या वाक्यावरून तुम्हाला चित्रपटाच्या कथेचा अंदाज आला असेलच. सिद्धार्थ चांदेकर याने स्पष्टीकरण देताना लिहिले की, "तुम्हाला खरंच वाटलं मी चाललोय लंडनला, मी नाही... तो चाललाय १८ महिन्यांसाठी. तिच्यापासून लांब... #missumaster #18months #21june "

 'सिद्धार्थ चांदेकर' आणि 'मृण्मयी देशपांडे' ही फ्रेश जोडी असलेला "मिस यु मिस्टर" हा सिनेमा २१ जून २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आणि याच दिवशी हिंदीमधील 'शाहिद कपूर' आणि 'कियारा अडवानी' यांची प्रमुख भूमिका असलेला "कबीर सिंग" हा सिनेमादेखील संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील चित्रपटगृहात हे दोन सिनेमे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यापेक्षा मराठी सिनेमा आपल्या प्रेक्षकांना कितपत आवडतो आणि त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणे रंजक ठरेल.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar