अण्णा परत आलाय... पहा ये रे ये रे पैसा २ सिनेमाचा टीजर येथे...

YE RE YE RE PAISA 2 TEASER OUT

 

 

 

२०१८ या वर्षात प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणजे "येरे येरे पैसा". 'उमेश कामत', 'तेजस्विनी पंडित', 'सिद्धार्थ जाधव', 'संजय नार्वेकर' आणि अन्य कलाकारांची भूमिका असलेला हा सिनेमा नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात करण्यात यशस्वी ठरला. एखाद्या हिट सिनेमाचा सिक्वेल करावा आणि दुसरा हिट सिनेमा द्यावा हे समीकरण काही नवीन नाही. यात समीकरणाला अनुसरण येरे येरे पैसा या सिनेमाचा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. "येरे येरे पैसा २" मध्ये आधीच्या सिनेमातील कलाकार दिसणार नसून या सिनेमात 'प्रसाद ओक', 'अनिकेत विश्वासराव', 'आनंद इंगळे', 'संजय नार्वेकर' आणि 'मृण्मयी गोडबोले' हे कलाकार दिसणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन 'हेमंत ढोमे' करणार आहेत. या सिनेमाचे लेखन 'ऋषिकेश कोळी' यांनी केले असून 'अमेय खोपकर', 'पर्पल बुल एंटरटेनमेंट' आणि 'ट्रान्स फॅक्स स्टुडिओज' अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. बहुप्रतिक्षित सिनेमांच्या यादीत स्थान मिळवलेला हा सिनेमा  ऑगस्ट २०१९ म्हणजेच स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांना खळखळून हसण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाला होता आणि आज या सिनेमातील संजय नार्वेकर यांच्या भूमिकेची दाखवणारा पहिला टीजर प्रदर्शित झाला आहे. अण्णा परत आलाय हे सांगणारा टीजर पहा येथे...अण्णा परत आलाय... पहा ये रे ये रे पैसा २ सिनेमाचा टीजर येथे.

 

Link -> https://www.instagram.com/p/BzXPDawFXSc/?utm_source=ig_web_copy_link

 

 

Read Next...


Featured News

Read something similar