SAGARIKA GHATGE
"चक दे इंडिया" या सुपरहिट बॉलीवूड सिनेमातून सर्वांना प्रभावित करणारी मराठी अभिनेत्री सागरिका घाटगे आता एक नवीन सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहे. मराठी मध्ये प्रेमाची गोष्ट या सिनेमातून तिने मराठी सिनेमा सृष्टीत पदार्पण केले आणि आता त्यानंतर ती आता तिचा दुसरा मराठी सिनेमा घेऊन येत आहे ज्याचे नाव आहे "मान्सून फुटबॉल". यानिमित्ताने चक दे इंडिया नंतर पुन्हा एकदा सागरिका घाटगे स्त्रियांना प्रोत्साहित करणारा स्पोर्टस् सिनेमा घेऊन येत आहे.
सागरिका घाटगे हिने नुकताच या सिनेमाचा पोस्टर आणि सिनेमातील तिचा फर्स्ट लूक आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट केला. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, "चला स्त्रीत्व साजरे करूया माझ्या आगामी मराठी सिनेमा मान्सून फुटबॉलच्या पोस्टर सोबत. चला एकत्र येऊया आणि २०१९ पिपा वुमन वर्ल्ड कप टीमला मला शुभेच्छा देऊया." मान्सून फुटबॉल या सिनेमांत सागरिका घाटगे बरोबर समीर धर्माधिकारी, अमोल कागणे, प्रीतम कागणे हे मराठी कलाकार देखील झळकणार आहेत. मिलिंद उके दिग्दर्शित या सिनेमात सीमा अजमी, कुरुष डेबू, डेलनाज इराणी, विद्या मालवदे आणि चित्राशी रावत हे बॉलीवूड मधील कलाकार पाहायला मिळतील.
Read Next...