ग्लॅमरस अभिनेत्री "सई ताम्हणकर" उचलतेय एक धाडसी पाऊल.

SAI TAMHANKAR

आपल्या सर्वांच्या आयुष्यात नाती’ या शब्दाला खूप वजन आहे आणि त्याहून जास्त वजनदार आहे ते म्हणजे नाती सांभाळण्याची जबाबदारी. पण नाती खरंच तितकी महत्त्वाची असतातप्रत्येक नात्याची जबाबदारी सांभाळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं काआयुष्याच्या वळणावर येणा-या वेगळ्या नात्यांचा प्रवास उलगडवणारा कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा मराठी चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मधून एक धाडसी पाऊल उचलतेय सई ताम्हणकर. 

तिला आख्ख  आयुष्य बदलून टाकायचं होतं. तिने पेहराव बदललातिने घर बदललंतिने नोकरी बदललीतिने ऍटिट्युड बदललातिने नवरा बदललातिने मित्र बदललातिने तिचं जगणं बदललं पण तिचं जगणं बदललं काभूमिका बदलत गेलेल्या भूमिकामागची भूमिका करणारी सई ताम्हणकर येतेय तुमच्या भेटीला.

 

 

हेही वाचा : 'रील' आणि 'रियल' पोलिसांची 'ग्रेट भेट'... वाचा संपूर्ण बातमी

 

 

चित्रपटांची पन्नाशी गाठणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे नेहमीच आजपासच्या गोष्टींमधून वेगळा दृष्टिकोन मांडणारा सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मधून अनुभवयाला मिळेल.  नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे आणि पोस्टरमध्ये दाखवल्यानुसार सई ताम्हणकर मुलगीपत्नीआई आणि प्रेयसी या अनेक नात्यांमध्ये दिसणार आहे. 

हेही वाचा : 'सोनाली कुलकर्णी' साकारणार इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील ‘हिरकणी’

स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाची निर्मिती स्मिता विनय गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित पोतदार आणि सीमा अलापे यांनी केली आहे. झपाट्याने बदलणा-या आजच्या काळात नात्यांचा अक्षांश रेखांशला छेद देणारा .कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपट २२ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar