शिकारी चित्रपटातील नेहा खान शर्मन जोशी सोबत बॉलिवूड चित्रपटात झळकणार...

NEHA KHAN IN SHIKARI

 गेल्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये एक मराठी सिनेमा खूप चर्चेत होता तो म्हणजे एक "शिकारी". मराठीमध्ये सहसा असे बोल्ड सिनेमे येत नाहीत म्हणून या सिनेमाची चांगली आणि वाईट दोन्ही बाजूंनी चर्चा रंगली होती. या सिनेमात एका हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसलेली अभिनेत्री 'नेहा खान' आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. ग्लॅमरस आणि हॉट अदांनी तिने सर्व प्रेक्षकांना घायाळ केले होते. त्यानंतर मात्र अजूनपर्यंत ती कुठल्या सिनेमात दिसली नाही.
 आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर सतत ऍक्टिव्ह राहणारी ही अभिनेत्री "शिकारी" नंतर आपल्याला कोणत्या चित्रपटात पाहायला मिळेल असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला होता. तर तिच्या सर्व फॅन्ससाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे लवकरच 'नेहा खान' बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. बॉलिवूड अभिनेता 'शर्मन जोशी' यांच्या आगामी चित्रपटात ती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता हा कोणता सिनेमा असणार आणि त्यात तिचा काय रोल असेल याच्यासाठी आपल्याला अधिकृत घोषणा होण्यापर्यंतची वाट बघावी लागेल.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar