हे कलाकार ठरले "महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? २०१९" चे विजेते.

MAHARASHTRACHA FAVORITE KON 2019

 

मराठी सिनेसृष्टीतील सर्व दिग्गज कलाकार एकत्र  येण्याचा आनंदायी सोहळा म्हणजे 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' ?.   'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? २०१९'  हा सोहळा नुकताच पार पडला. झी टॉकीज हि वाहिनी दरवर्षीच काही ना काही धमाकेदार  कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते.  महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक तारेतारका रेड कार्पेटवर पाहायला मिळतात. 

 

 

 

हेही वाचा : आयुष्यात मिळालेली दुसरी संधी ही अत्यंत महत्त्वाची – राहुल देशपांडे

 

 

  वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, पल्लवी पाटील, शिवानी सुर्वे, मानसी नाईक अशा अनेकांनी नृत्य सादर करून आपली वेगळी छाप  प्रेक्षकांवर  पाडली. वैभव तत्ववादी आणि अमेय वाघ यांचं खुमासदार सूत्रसंचालन या सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. 

 

 

हेही वाचा : ‘केसरी’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण.

 

 

 

 

हेही वाचा : अभिनेत्री पूजा सावंत चा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या सोहळ्याची सगळ्यात मोठी खासियत, म्हणजे यातील विजेत्यांची निवड थेट प्रेक्षकांकडून केली जाते . त्यामुळेच, यंदाच्या वर्षात सर्वांचा अत्यंत लाडका ठरलेला, 'खारी बिस्कीट' हा सिनेमा, सर्वाधिक पुरस्कार मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने एकूण चार पुरस्कार पटकावले. आणि 'खारी बिस्कीट'ने आपला निराळा ठसा उमटवला आहे. संजय जाधव यांनी 'फेवरेट दिग्दर्शक' हा पुरस्कार मिळवला, तर अमितराज यांच्या 'तुला जपणार आहे' या गीताला फेवरेट गीत म्हणून निवडण्यात आलं. याच गीताचे गायक 'आदर्श शिंदे आणि रोंकिणी गुप्ता', हे फेवरेट सिंगर सुद्धा ठरले. या शर्यतीत 'हिरकणी' सुद्धा मागे पडली नाही. तसेच मराठी बिगबॉस फेम शिवानी सुर्वेने देखील फेव्हरेट पॉप्युलर फेस म्हणून देखील पुरस्कार पटकावला. 

 

 

 

 

 

 

 

प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेला हिरकणी हा चित्रपट, प्रेक्षकांचा 'फेवरेट चित्रपट' ठरला. सोनाली कुलकर्णी हिने 'फेवरेट अभिनेत्री' म्हणून पुरस्कार मिळवला, तर सहाय्यक अभिनेता प्रसाद ओक सुद्धा सर्वांचा 'फेवरेट' ठरला. २०१९ चा 'फेवरेट अभिनेता' ठरण्याचा मान, हॅन्डसम कलाकार ललित प्रभाकर याला मिळाला. 

 

 

 

 

 

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१९ मधील विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे;
महाराष्ट्राचा फेव्हरेट दिग्दर्शक: संजय जाधव
महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट: हिरकणी
महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता: ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)
महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री: सोनाली कुलकर्णी (हिरकणी)
महाराष्ट्राचा फेव्हरेट सहाय्यक अभिनेता: प्रसाद ओक (हिरकणी)
महाराष्ट्राची फेव्हरेट सहाय्यक अभिनेत्री: मृणाल कुलकर्णी (फत्तेशिकस्त)
महाराष्ट्राचा फेव्हरेट गायक: आदर्श शिंदे (खारी बिस्कीट)
महाराष्ट्राची फेव्हरेट गायिका: रोंकीणी गुप्ता (खारी बिस्कीट)
महाराष्ट्राचे फेव्हरेट गीत: अमितराज (खारी बिस्कीट)
महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस: शिवानी सुर्वे
महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन: अंकुश चौधरी
गोल्डन दिवा अवॉर्ड: मृणाल ठाकूर

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar