'खारी बिस्कीट' सिनेमाला आयएमडीबीवर मिळाले सर्वात जास्त रेटिंग्स

KHARI BISCUIT

झी स्टुडियोज् आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित खारी बिस्कीट हा सिनेमा फिल्ममेकर संजय जाधव ह्यांची 50 वी कलाकृती आहे. सध्या ड्रिमिंग ट्वेंटि फोर सेव्हन निर्मित खारी बिस्कीट सर्वत्र हाऊसफुल होत असतानाच आता ह्या सिनेमाच्या टीमसाठी दुग्धशर्करा योग म्हणजे, आयएमडीबीवर सिनेमाला 8.9 रेटिंग्स मिळालेली आहेत. गेल्या काही महिन्यात सिनेमागृहांमध्ये झळकलेल्या मराठी सिनेमांपैकी खारी बिस्कीट हा एकमेव सिनेमा आहे, ज्याला हाऊसफुल सिनेमाहॉल्ससोबतच आयएमडीबीकडून अशाप्रकारे कौतुकाची थापही मिळाली आहे.

हेही वाचा : सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित.

हेही वाचा : अमृता आणि पुष्कर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे लंडनमधील शेअर केले खास फोटोज.

 

 

सूत्रांच्या माहितीनूसार, खारी आणि बिस्कीट ह्या बहिण-भावाच्या जोडगोळीची कथा प्रेक्षकांना अगदी आपलीशी वाटतेय. तुला जपणारं आहे’, आणि खारी’ ह्या दोन्ही गाण्यांना मिलयन्समध्ये व्ह्युज मिळून सोशल मिडीयावर ट्रेंडिंग असलेली ही गाणी अनेकांच्या कॉलर ट्युन्स बनलेल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यात मराठी सिनेसृष्टीला एका सुपरहिट सिनेमाची गरज होती. खारी बिस्कीट त्यातल्या निरागसतेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तुहिरे ह्या संजय जाधव ह्यांच्या सुपरहिट सिनेमांपेक्षाही खारीबिस्कीटला जास्त आयएमडीबी रेटिंग्स मिळाली आहेत. 

 

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar