शिवानी सुर्वे पुन्हा परतणार बिग बॉसच्या घरात.

Shivani Surve will be enter in Bigg Boss Marthi 2 House.


बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व स्पर्धकांमधल्या सततच्या वाद-विवादांमुळे चांगलंच चर्चेत आहे. पण त्याचबरोबर टास्क पूर्ण करताना स्पर्धकांमध्ये एकी निर्माण होताना बघायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक टास्क हा स्पर्धकांची सहनशक्ती पणाला लावणारा असतो. जो हे टास्क नीट समजून घेऊन, बिग बॉसच्या अटींचं पालन करून पूर्ण करतो त्याचाच ह्या घरात खऱ्या अर्थाने निभाव लागतो. मात्र काही स्पर्धक या विधानाला अपवाद ठरले आहेत. 
 
 
'बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले आणि शिवानी सुर्वे यांना त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे तर परागला एका टास्क मध्ये नेहा बरोबर झालेल्या वादविवादांमुळे घराबाहेर पडावं लागलं. पण ह्या आठवड्यात यांपैकी एक स्पर्धक पुन्हा घरात परतणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ह्या आठवड्याच्या विकेंडचा डाव मध्ये शिवानी सुर्वे पुन्हा एकदा घरात परतणार आहे.
 
 
शिवानी सुर्वे तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी घरात ओळखली जात होती. घरात कोणाचीही भीड न बाळगता प्रत्येक टास्क तिने जिद्दीने पूर्ण केला. परंतु तब्येतीच्या कारणामुळे शिवानीला घराबाहेर पडावं लागलं. शिवानीच्या घरातील वागणुकीमुळे तिला सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या रागाचा सामना करावा लागला होता. घराबाहेर पडण्याच्या निर्णयामुळे शिवानीच्या चाहत्यांची देखील निराशा झाली होती. आता शिवानी पुन्हा एकदा घरात प्रवेश करून तिच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल का? हे पाहणं औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे.
 

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar