बिग बॉस दिवस ११- शिवानी बिचुकलेंना देणार घर कामाचे धडे..

SHIVANI SURVE AND ABHIJEET BICHUKLE
 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये माधव आणि अभिजीत बिचुकले यांची चांगली मैत्री आहे... तर आज माधव आणि बिचुकलेंमध्ये एक संभाषण होताना दिसणार आहे, जिथे माधव म्हणतो आहे, तुम्ही सगळे माझी बाहेर जाण्याची वाट बघत आहात, मी इथे वाट बघतो आहे तुम्हाला बाहेर पाठविण्याची...हेच करतायना तुम्ही ? त्यावर बिचुकले म्हणाले १०० टक्के...  दिगंबर नाईक तिथे येताच या दोघांनी कारण दिले आज आमचा performance आहे आणि त्यानंतर माधवने हेच संवाद हिंदीमध्ये कसे म्हणायचे हे अभिजीत बिचुकले यांना सांगितले. आता हा नक्की कुठल्या टास्कचा भाग आहे असणार आहे का काही वेगळे हे आजच्या भागामध्ये कळेलच...
 पुन्हा एकदा शिवानी सुर्वे अभिजीत बिचुकले यांची शाळा घेताना दिसणार आहे... त्याचे असे झाले कि
, शिवने कॅप्टन झाल्यावर घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी सदस्यांना वेगवेगळ्या टीम्स मध्ये टाकले... आणि त्यामुळे  अभिजीत बिचुकले आणि शिवानी सुर्वे हे एका टीममध्ये आले... आणि बिचुकले यांना घरच्या कामाची फारशी सवय नाही आणि त्यांना ते जमत देखील नाही याचा अंदाज शिवानीला आला आहे... शिवानीने बिचुकले यांना सांगितले “मी रीझाईन करेन या कामामधून” त्यावरून बिचुकले यांनी मजेदार प्रतिक्रिया मारायला सुरुवात केली... तर शिवानीने शिवला सांगितले “मी जेवणाच्या टीममध्ये जाते” ... असं कोण झाडू मारतं ? हा प्रश्न शिवानीला पडला आहे... बिग बॉसच्या घरात आलं कि प्रत्येक कामामध्ये सदस्यांना मदत करावी लागते... आणि आता शिवानी  बिचुकले यांना झाडू कशी मारायची हे  शिकवणार का ? हे बघणे गंमतीशीर असणार आहे... याआधी तिने बिचुकलेंना त्यांचे कपडे आणि जागा कशी साफ ठेवावी हे शिकवले होते... तेंव्हा नक्की बघा ही गंमत आजच्या बिग बॉस मराठी सिझन २ च्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Read Next...


Popular News

Read something similar