कोरोनामुळे सिनेसृष्टीला १३ दिवसाचं सुतक .... वाचा संपूर्ण बातमी.

सध्या एकाच गोष्टीचं नाव घेण्यात येत आहे ते म्हणजे 'कोरोना व्हायरस' . देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका उद्योगधंध्यापासून ते शाळा, कॉलेज , सिनेगृह- नाट्यगृह यांना देखील बसला आहे. ओपन पार्क, स्विमिंग पूल सुद्धा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचबरोबर सिनेसृष्टीलाही कोरोनाचा चांगलाच फटका बसला असून मालिका - चित्रपटाचे चित्रीकरण १९ ते ३१ पर्यंत थांबवण्यात आले आहे.  मालिकांना बॅक अप साठी जवळपास 19 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. पण त्यानंतर प्रसारित होत असलेल्या मालिकांची जबाबदारी वितरकांची राहील असं या बैठकीत नमूद केलं आहे. 19 तारखेनंतर 31 तारखेपर्यंत कोणतंही शुटिंग केलं जाणार नाही. त्यानंतर कोरोना संसर्ग नियंत्रणात असेल तर 31 तारखेनंतर शुटिंग सुरु केलं जाईल.  याबाबत इंडियान मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन यांनी माहिती दिली असून त्याबाबतचे परिपत्रक सुद्धा झळकवले आहे. तर आता सिनेसृष्टीतील सर्व मालिका, बेव सिरिज, चित्रपट यांचे चित्रिकरण रद्द करण्यात आले आहे.

 

 

राज्यातील वाढती कोरोना संक्रमणाच्या रुग्णांची संख्या पाहता आणि त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी विविध प्रकारे काळजी घेण्यात येत आहे. तसेच नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन सराकरकडून करण्यात येत आहे.  तसेच सरकारने राज्यात वैद्यकीय आणीबाणी सुद्धा जाहीर केली आहे.

 

 

Tags

Read Next...


Popular News

Read something similar