या अभिनेत्याच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन झुंडमध्ये काम करण्यास तयार झाले.

JHUND MOVIE

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या झुंड या आगामी चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सैराट प्रमाणेच या सिनेमालाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल ह्यात शंका नाही. पण हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे,  ते म्हणजे  सुरवातीला सिनेमाच्या मेकर्सवर कॉपीराईटच उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला. तसेच अमिताभ बच्चन यांनी 'झुंड' चित्रपट करण्यास नकार दिला होता.  या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांनी सिनेमाकडे पाठ फिरवली होती.  कारण शूटिंगच्या अनेक अडचणी येत होत्या.

 

 

हेही वाचा : 'देवी' शॉर्टफिल्म मध्ये झळकणार मराठी अभिनेत्री.

सतत शूटिंगच्या तारखा बदल होत्या अमिताभ बच्चन यांचे कामाचे शेड्युल बिघडत होते . त्यामुळे त्यांनी  हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. अमिताभ यांनी निर्मात्यांकडून घेतलेले मानधन देखील परत केले होते.  अमिताभ यांना 'झुंड' चित्रपटात पून्हा परत आणण्यासाठी  आमिर खानला मध्यस्ती करावी लागली.

 

हेही वाचा : वीणा जगतापचे हे फोटोज तुम्ही पहिले का ?

 

अमिताभ यांचे पुढील वेळापत्रक कोणत्याही गोष्टींमुळे कोलमडणार नाही याची निर्मांत्यांनी पुरेपुर काळजी घेत पुढच्या 45 दिवसांत सिनेमाचे शूटिंग संपवले. शूटिंगवेळी अमिताभ हे व्हॅनिटीत न बसता झोपडपट्टीतील मुलांसह वेळ घालवत असत. याच मुलांबरोबर त्यांनी सिनेमात शूटिंगही केले आहे. 

 

हेही वाचा : 'मेकअप' चित्रपटातील पहा नवीन गाणं 'गाठी गं'....

 

 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाच्या  भूमिकेत झळकणार असल्याचे समजतंय.  नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाची प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नसून याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar