अर्चना निपाणकरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण.. पानिपत चित्रपटात साकारणारी ही भूमिका

  ARCHANA NIPANKAR TO PLAY ANANDIBAI IN PANIPAT

 

 

 

झी मराठी वाहिनीवरील 'का रे दुरावा' या मालिकेतून नावारूपाला आलेली अभिनेत्री 'अर्चना निपाणकर' हिने सुंदर रूपासोबतच आपल्या सुंदर अभिनयाचे देखील दर्शन प्रेक्षकांना घडवले आहे. यानंतर '100 डेज', 'राधा ही प्रेम रंगली' या मालिका आणि 'गेला उडत' या नाटकातून ती आपल्या भेटीला आली. म्हणूनच अर्चना आता चित्रपटसृष्टीत कधी दिसणार हा प्रश्न येणारच होता आणि आता ती आपल्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे आणि ते देखील बॉलिवूडमधील बिग बजेट सिनेमा 'पानिपत' मधून. अजून पर्यंत कोणतीही फिल्म न केलेल्या अर्चनाला थेट बॉलिवूडची लॉटरी लागल्यामुळे ती प्रचंड खुश आहे.
 
 
 
 
 
 
 
 आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' हा बजेट बॉलीवूड सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. या सिनेमात अर्जुन कपूर, क्रिती सनोन आणि संजय दत सारखे बॉलीवूड सुपरस्टार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मराठी अभिनेता गश्मीर महाजनी देखील या सिनेमात 'जनकोजी शिंदे' ही भूमिका साकारत असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वी दिली होती. याव्यतिरिक्त मराठी अभिनेत्री अर्चना निपाणकर या सिनेमात पेशवा साम्राज्यातील काहीशा चर्चेत आणि वादग्रस्त ठरलेल्या 'आनंदीबाई' यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. 
 
 
 
 
 
 
 
 या सिनेमाच्या शुटिंगबद्दलचा आपला अनुभव सांगताना अर्चना म्हणते की, "आशुतोष गोवारीकर सारख्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. अर्जुन कपूर आणि कृती सनोन सोबत माझे काही सीन्स आहेत आणि ते करताना देखील खूप मजा आली. माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला सिनेमाच्या संपूर्ण टीमने उत्तम रित्या सांभाळून घेतले त्यामुळे मला काम करताना खूप कम्फर्टेबल वाटले. या सिनेमाचे शुटिंग आता जवळपास संपत आले असून माझ्या भूमिकेचे काही दिवसांचे शूट अजून बाकी आहे. ६ डिसेंबर २०१९ हा सिनेमा प्रदर्शित होणार असून मी बॉलीवूड पदार्पणाच्या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे.

Read Next...


Featured News

Read something similar