जगात भारी आम्ही पोरं मराठमोळी.. रंपाटमधील रॉकींग मराठमोळं रॅप सॉंग..

RAMPAAT RAP SONG OUT NOW


 'अभिनय बेर्डे' आणि 'कश्मिरा परदेशी' त्यांच्या आगामी "रंपाट" सिनेमाची प्रेक्षकांमध्ये सध्या उत्सुकता आहे. या सिनेमाचा टीझर आणि दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. खूप दिवसांपासून चर्चेत असलेले रंपाट मधील रॅप सॉंग आता प्रदर्शित झाले आहे. मराठमोळ्या या रॅप सॉंगला रॅपर्स 'जॅझी नानू', 'एक्सबाॅय', 'ए जीत' आणि 'जे सुबोध' यांनी रॅपबद्ध केले आहे. तर या रॉकिंग गाण्याचे शब्द याच ४ रॅपर्स आणि दिग्दर्शक 'रवी जाधव' यांनी मिळून लिहिले आहेत. चिनार-महेश या जोडीने संगीतबद्ध केलेले हे गाणे प्रत्येक मराठी प्रेक्षकांना आवडेल असेच आहे, तर पहा हे गाणे येथे...

 या गाण्याचे वैशिष्टय म्हणजे खुप दिवसानंतर मराठी सिनेमांमध्ये आल्यामुळे याचे शब्द सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात.

ये भावड्या ऐक ना बे

मराठी रॅप हा बे

हा घालणार राडा उडेल तुझा थरकाप ना बे

संताप हा रे, होईल तुझाच ना रे, जेव्हा मी देईन तुला शब्दांचा हा शॉट ना रे

किती आले, किती गेले कोणाच्या आलो नाय हाताने 

घाम सांडून,कला मांडून,आलो स्वतःशी मी भांडून

केली मेहनत, बनलो मेहनती, केली उन्नती, केली प्रगती, अशी घेतली गती मनाची,

वाढवली श्रीमंती!

जगात भारी आम्ही पोरं मराठमोळी

जर का ठरवलं काही करू मुलं नादखुळी

डोक्याला शॉट नाय बाकी हे निवांत हाय

नडला जर का आम्हा तर भावा व्हणार दंगल नाय

आलो म्होरं आम्ही पोरं अंगी बळ आहे जोर

बनू थोर बोली गोड मेहनतीची त्याला जोड

स्वप्नं केली पूर्ण काढल्यात जागून राती

आता जगणं माझं फक्त मराठीत गाजण्यासाठी

रंपाट लय रंपाट

बिंधास मराठी पोरं ही रंपाट

रंपाट लय रंपाट

घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट

जपली मराठी संस्कृती,जोडली नाती, माती ख्याती विसरून जाती पाती महाराष्ट्राची ही कीर्ती सांगू किती,येईल भरती,प्रेम करतो भाषेवर्ती जपतो माणुसकी मराठी सांगतो नवशाहीर 

अभिमानाने,ज्ञानाने लहान मोठ्या थोराने ऐक तुझ्या कानाने रंपाट या पोराने केला धुरळा,आत शिरला,पुरून उरला मर्द गडी,भाषेत गोडी घेतली रंपाट उडी बघ कशी भुरर

तांबडा पांढरा व्हढला हाय 

रांगडा मी भिडलो हाय

घाटी मी मराठी म्हणून लेका मी तर रंपाट हाय

कालचा मी आज नाय

स्वप्नं जगतोय सत्त्यात काय

मागून बोलणारे हे आज बोलतायत 

अगं आय आय

प्रवाहाच्या विरोधात भावा पव्हलोय मी

आणली ती स्थिती आधी माझी कधी नव्हती

येऊदेत कितीपण अडचणी माझ्या म्होरं हसून मी बोलेन त्यांना काय चालतंय की

रंपाट लय रंपाट

बिंधास मराठी पोरं ही रंपाट

रंपाट लय रंपाट

घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट..Read Next...


Popular News
Featured News

Read something similar