नाट्य आणि सिनेसृष्टीतील कामगारांसाठी अभिनेत्री अश्विनी भावे यांचा पुढाकार.

कोरोनासारख्या भयानक आजाराने सर्वांनाच घाबरवलं आहे. आज लॉकडाऊनमूळे आपण सगळेच घरात आहोत ज्यांना शक्य आहे ते लोक घरबसल्या काम करत आहेत. पण कलाकार मंडळी ? फिल्म इंडस्ट्री बंद झाली, नाटक , थिएटर्स बंद करण्यात आले. मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण थांबण्यात आले. अशा परिस्थितीत कलाकार मंडळी काय करणार. पडद्यामागील आणि पडद्यावरील सर्वानाच बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतोय.  नाटक कलाकार , रंगमंच कामगारचं  काय ? यांचा विचार कोणी केलाय का?  रंगमंच कामगार संघटनेकडून कामगारांना मदत करण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढं केला आहे. आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अश्विनी भावे यांनी देखील मराठी नाट्य आणि सिने सृष्टीतील कलाकारांसाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

 

 

 

 

 

'एक हात आपुलकीचा, विश्वासाचा आपल्या माणसांना सावरण्याचा'. मराठी नाटक समूहाच्या ह्या प्रामाणिक उद्देशावर आणि केलेल्या मदतनिधीचा थेट विनियोग संबंधित गरजू रंगकर्मीनाच मिळेल ह्या विश्वासानं मराठी नाट्य, चित्रपट अश्विनी भावे ह्यांनी मराठी नाटक समूहाच्या उपक्रमाला रुपये पाच लाखांच आर्थिक पाठबळ दिलेलं आहे, आणि ह्यापुढे देखील पुढचे तीनं महिने अश्याच पद्धतीनं मदत करण्याचं ठरवलं आहे . म्हणजेच एकूण रुपये २० लाखंची मदत करण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. समस्त मराठी नाटक समूह आणि पडद्यामागील २०० कलाकार अश्विनी भावे ह्यांचे ऋणी आहेत', असं प्रशांत दामले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

 

 

त्याचबरोबर  करोनामुळं नाट्यव्यवसायावर झालेला परिणाम आणि रंगमंच कामगारांवर ओढवलेलं संकट लक्षात घेऊन प्रशांत दामले देखील कामगारांच्या मदतीला धावले आहेत. एकूण २३ कामगारांना दामले यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे. 

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar