एकदम कडकच्या मंचावर बिग बॉसच्या कलाकारांमध्ये वादाची ठिणगी

BIG BOSS CELEBS IN EKDAM KADAK

 मागील वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला ज्या कार्यक्रमाने वेड लावले, ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली असा प्रेक्षकांचा आवडता रिऍलिटी शो म्हणजेच बिग बॉस मराठी. या कार्यक्रमाचा सिझन दुसरा कलर्स मराठीवर सुरु होत आहे. याच निमित्ताने या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला सुपरहिट बनवणारे सदस्य एकदम कडकच्या मंचावर आले आहेत. बिग बॉसच्या घरातील अनेक आठवणींना या कार्यक्रमामध्ये उजाळा मिळणार आहे, तर प्रेक्षकांना काही आरोप – प्रत्यारोप, वाद – विवाद देखील बघायला मिळणार आहेत. मेघा आणि आरती, उषा नाडकर्णी आणि नंदकिशोर चौघुले यांच्यामध्ये वादाची ठिणगी उडणार आहे. याचबरोबर रेशम टिपणीस, बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये ज्यांची मैत्री खूप चर्चेत राहिली असे मेघा धडे, सई लोकूर आणि पुष्कर जोग, शर्मिष्ठा राउत आणि नंदकिशोर चौघुले, विनीत भोंडे, स्मिता गोंदकर – सुशांत शेलार,यांचे एकदम कडक परफॉर्मन्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. तत्पूर्वी पहा हा विडिओ... तेंव्हा नक्की बघा एकदम कडकचे बिग बॉस मराठी स्पेशल भाग या आठवड्या बरोबरच पुढच्या आठवड्यामध्ये सुध्दा सोम ते बुध रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. या विशेष भागाचे सूत्रसंचालन अष्टपैलू अभिनेता जितेंद्र जोशी करणार आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या प्रोमोजबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा आहे. या प्रोमोजवरून प्रेक्षकांनी कार्यक्रमामध्ये कोणत्या क्षेत्रातील सदस्य असतील याबद्दल तर्क लावायला सुरुवात केली आहे. याचसंदर्भात जितेंद्र जोशी यांनी अनिल थत्तेना विचारले जर राजकारण्यांचं बिग बॉस बनवलं तर कोणी कोणी घरात जावं ? ऋतुजाला देखील विचारले बीग बॉसमुळे लोकांचं तुझ्याबद्दल मत बदललं का ? तसेच अनिल थत्तेना विचारले कोणाला सॉरी म्हणायचे आहे कोणाचे आभार मानायचे आहेत ? असे प्रश्न विचारले आहेत. तेंव्हा या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांना या कलाकारांनी काय उत्तरे दिली आणि काय काय धम्माल मस्ती केली हे नक्की बघा आपल्या कलर्स मराठीवर

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar