भरत जाधव सोबत झळकणार स्त्रीलिंग पुलिंग जोडी मराठी सिनेमात‌..

SAYLI PATIL

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी "स्त्रीलिंग पुल्लिंग" या मराठी वेबसिरीजने धुमाकूळ घातला होता. या वेबसेरीजमध्ये 'निखिल चव्हाण' आणि 'सायली पाटील' यांची भांडणमय केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. अनेकांनी या दोघांना परत पाहण्याचा योग कधी येईल अशी विचारणा देखील केली होती. आणि आता हे दोघं पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत आणि ते सुद्धा कॉमेडी किंग 'भरत जाधव' आणि 'वैभव मांगले' यांच्या सोबत. 'निखिल चव्हाण', 'सायली पाटील', 'भरत जाधव' आणि 'वैभव मांगले' हे चारही जण आपल्याला एकत्र एका नवीन मराठी सिनेमात दिसणार आहेत ज्याचे नाव आहे "धोंडी चम्प्या एक प्रेम कथा". 'ज्ञानेश भालेकर' लिखित या सिनेमाची निर्मिती 'सुनील जैन', 'आदित्य जोशी', 'आलोक ठाकूर', 'आदित्य शास्त्री' आणि 'वेनेला रॉय' यांनी केली आहे. या सिनेमातील गाणी 'गुरू ठाकूर' आणि 'मंदार चोळकर' लिहीत असून त्यांना 'सौरभ-दुर्गेश'  संगीत बद्ध करणार आहेत. 
 नुकताच या सिनेमाचा मुहूर्त सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत पार पडला. विनोदी पठडीतला हा सिनेमा उमाजी अंकुश या दोन एकाच गावात राहणाऱ्या बागायतदारांच्या भांडणवर आधारित आहे.  या दोघांच्या भांडणात एका प्रेम करणाऱ्या जोडप्याची कशी होरपळ होते याचे धमाल सादरीकरण आपल्याला या सिनेमात पाहायला मिळेल. पहिल्यांदाच एकत्र काम करणारी ही जबरदस्त स्टारकास्ट सिनेमांमध्ये काय कामाला करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar