नियमांचे पालन करत "समांतर पर्व २" च्या चित्रकारणाला होणार सुरुवात.

लॉकडाउनच्या या काळात विविध वेबसिरीजने आपला सर्वांचं मनोरंजन केलं. खरतर आता सध्या वेबसिरीजचा ट्रेंड सुरु आहे. याच काळात प्रदर्शित झालेली . " समांतर " या वेबसिरोजने सगळ्यांची मन जिंकली. समांतरच्या पहिल्या भागाला 100 मिलीयन पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले होते. एक रहस्यमय कथेमुळे  ह्या वेबसिरीजच्या दुसऱ्या पर्वाची उत्सुकता सर्वांनाच होती.

 

 

 

राज्य सरकारने काही नियम आणि अटींचं पालन करून चित्रीकरणास परवानगी दिल्यानंतर आता या नियमांचं पालन करत ‘समांतर-2’ च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात या वेब सिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे समजले आहे.  कार्तिक निशाणदार यांनी निर्मित केले असून सतिश राजवाडे यांनी दिग्दर्शन केले आहे. 

 

प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित ही वेब सिरीजचआहे. अभिनेता स्वप्निल जोशीचा हा वेब डेब्यू असून तो यशस्वी ठरलेला आहे. याशिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडितचाही हा वेब डेब्यू होता. कृष्णच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले नितीश भारद्वाज यांनी या वेब सिरीजमध्ये सुदर्शन चक्रपाणी ही भूमिका साकारली आहे. तेव्हा या भविष्याचा वेध घेणारी रहस्यमयी कहाणी असलेल्या वेब सिरीजचा अपूर्ण शेवट पूर्ण करण्यासाठी ‘समांतर’च्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना  आता उत्सुकता लागून राहिली आहे.

 

 

एम एक्स प्लेयरवर ही वेबसिरीज प्रदर्शित करण्यात आली होती.   याशिवाय निर्माते कार्तिक निशाणदार ‘नक्सल’ ही हिंदी वेब सिरीजही घेऊन येणार आहेत. येत्या 15 दिवसांमध्ये या वेब सिरीजचही चित्रीकरण सुरु होणार आहे.

Tags

Read Next...


Featured News

Read something similar