म्हणून सुशांत माझ्यासाठी खूप स्पेशल होता. .. तेजस बर्वे.

सुशांत राजपूतच्या या घटनेमुळे सिनेसृष्टीतील सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांत सिंघ राजपूतच्या जाण्याने बॉलिवूड कलाकारांपासून ते मराठी कलाकारांपर्यंत सर्वानी त्यांचा भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.   सुशांतच्या आत्माहत्येचं कारण म्हणजे त्याच नैराश्य. गेले काही दिवस सुशांत डिप्रेशन मध्ये होता. त्याच्यावर मानसोउपचार देखील केले जात होते. पण सुशांत असं काहीतरी  पाऊल उचलेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.  

 

 

सुशांतच्या आत्माहत्येची बातमी ऐकताच झी मराठीवरील "मिसेस मुख्यमंत्री" या मालिकेतील समरसिंग पाटील म्हणजेच अभिनेता तेजस बर्वे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हीडीओमध्ये त्याने सुशांत त्याचासाठी किती खास होता हे सांगितलं आहे. 

 

 

 

सुशांतचे पार्थिव दुपारी ४ वाजता अंत्यविधीसाठी कूपर हॉस्पिटलमधून पार्ल्यातील स्मशानभूमीत आणण्यात आले. मूळचा बिहारमधील पटनात राहणाऱ्या सुशांतचे वडिल आज दुपारी मुंबईत दाखल झाले होते. ते आधी ज्या घरात सुशांतचे आत्महत्या केली त्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये गेले. त्यांनतर कूपर हॉस्पिलटमध्ये मुलाच्या अंत्यदर्शनासाठी आले. सायंकाळी रुग्णवाहिकेतून सुशांतचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून स्मशानभूमीच्या दिशेने रवाना झाले. सुशांतचे वडिल, दोन बहिणी, अभिनेत्री श्रद्धा कपूर, गायक उदित नारायण यांच्यासह काही मित्र परिवार स्मशानभूमीत त्याच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. 

 

 

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar