या ५ अभिनेत्रींची रंगणार डान्स अंताक्षरी.

लॉकडाउनच्या या काळातही स्वतःच मन रमवण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही करत आहे. कोणी वेबसिरीज बघत आहे, कोणी घर बसल्या विविध कला जोपासत आहेत. कलाकार मंडळी देखील या लॉकडाऊन मध्ये काय आय करत असतात हे आपण सोशल मीडियाचा माध्यमातून पाहतच असतो. आता ५ अभिनेत्रींची डान्स अंताक्षरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

 

 

 अभिनेत्री  मयुरी वाघ,गौतमी देशपांडे,शर्मिष्ठा राऊत,विदिशा म्हसकर,सायली परब शेलार या ५  अभिनेत्रींसह एक आगळंवेगळं सादरीकरण नुकतच मिरीयाड आटर्र युटूबचैनल वर प्रदशित झालं आहे. सोशल मीडियावर देखील  या अगळ्या वेगळ्या अंताक्षरीच्याच  व्हिडिओची चर्चा रंगत आहे. 

 

 

 

 

आजच्या या तणावपूर्ण परिस्थितीत आपल्या लाडक्या अभिनेत्री रोजची धावपळ, सहकलाकार,  त्यांचा वैविध्यतेने नटलेला सेट मुख्य म्हणजे रसिक चाहते या सगळ्यांना मिस करतायेत. म्हणूनच आपल्या  चाहत्यांसाठी, त्यांच्या चेहऱ्यावर या तणावातून थोडावेळ का होईना हसू खिलवण्यासाठी हे क्षण टिपण्याचा  एकमेव प्रयत्न.   ‘बैठे बैठे क्या करे’ या चारोळीने आपली अंताक्षरी चालू होते. आपली अंताक्षरी गाण्याची असते. पणआज ही अंताक्षरी डान्सची आहे हं! लॉककडाऊनच्या या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींना  घेऊन केलेले विशेष सादरीकरण तसेच नृत्यदिग्दर्शन श्रेयस देसाई यांनी केलं आहे.

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar