रेणुका शहाणेच्या चित्रपटात काजोल, शबाना आझमी आणि मिथिला पालकर... वाचा संपूर्ण बातमी...

RENUKA SHAHANE







 मराठमोळी अभिनेत्री 'रेणुका शहाणे' यांनी मराठी तसेच हिंदी सिनेमांमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'हम आपके है कौन' हा हिंदी सिनेमा सुपर डुपर हिट ठरला होता. अभिनय नंतर आपल्या दिग्दर्शनाच्या पदार्पणात त्यांनी "रीटा" सारख्या सिनेमामध्ये जॅकी श्रॉफ, पल्लवी जोशी, मोहन आगाशे, तुषार दळवी अशा अभिनेत्यांना एकत्रित आणले होते. यानंतर अभिनेत्री म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू ठेवली. आता रेणुका शहाणे पुन्हा एकदा दिग्दर्शन क्षेत्राकडे वळणार आहेत. 







 तब्बल १० वर्षांनंतर रेणुका शहाणे आता सिद्धार्थ मल्होत्रा निर्मित आगामी सिनेमा "त्रिभंग" च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. स्त्रीशक्तीवर आधारित या सिनेमात कणखर स्त्रियांची भूमिका साकारण्यासाठी ३ जबरदस्त अभिनेत्र्यांची निवड झाली आहे. यापैकी पहिली अभिनेत्री म्हणजे 'मुरांबा' या सिनेमात झळकलेली मराठी अभिनेत्री "मिथीला पालकर" होय. तर दुसरी अभिनेत्री म्हणजे हिंदी सिनेमासृष्टीचा दांडगा अनुभव असलेल्या 'शबाना आझमी'. 








 या दोघांव्यतिरिक्त या सिनेमात आणखीन एका मोठ्या अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे ते म्हणजे अभिनेत्री 'काजोल' हिचे. या तीनही अभिनेत्र्यांना चित्रपटाची कथा आवडली असून लवकरच या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. वर्षाच्या शेवटी या सिनेमाचे शूटिंग सुरू होणार असून पुढील वर्षी हा सिनेमा आपल्या भेटीला येईल असे म्हटले जात आहे. तब्बल १० वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करणाऱ्या रेणुका शहाणे एक चांगला सिनेमा प्रेक्षकांना भेट म्हणून देतील अशी अपेक्षा आहे.

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar