अभिनेता हेमंत ढोमे यांनी केली आगामी चित्रपटाची घोषणा.

महाराष्ट्रात, छत्रपती 'शिवाजी महाराज' यांनी स्वराज्य उभे करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकले. या सर्व गड किल्ल्यांचे महत्त्व अनेक तरुणांना हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला.  महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गड किल्ले हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. पण महाराज्यांच्या किल्ल्यांची झालेली दुर्दशा, नागरिकांमध्ये असलेली अनास्था तसेच राजकारण्यांनी सत्तेसाठी महाराजांना एक ब्रॅण्ड म्हणूनच उभे केले आहे. या सर्व विषयांवर बघतोस काय.. भाष्य करतो.

 

 

 

दरम्यान, पुन्हा एकदा आपल्या आगामी 'बघतोस काय मुजरा कर 2' या चित्रपटाच्या माध्यमातून हेमंत ढोमे दुर्गसंपदेचा वैभवशाली इतिहास अभिमानानं साऱ्या जगाला सांगणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये 'मोहीमदुर्ग बांघणी' असं लिहण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट तमाम शिवप्रेमींसाठी उत्तम कलाकृती असणार आहे.

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar