शूटिंगचा रंग आता वेगळा....

Producer Atul Ketkar

काेराेनाच्या संकटामुळे टीव्ही मालिका विश्व ठप्प झाले होते. पण आता पुन्हा नव्याने चित्रपट - मालिका यांच्या  शूटिंगचा  नव्याने  श्री गणेशा करण्यात येणार आहे.  राज्य सरकारने मुंबई आणि महाराष्ट्रात containment zone वगळता इतरत्र अटी शर्थी ठेवत चित्रीकरणाची परवानगी दिली असून सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आव्हान केले आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या आयुष्यातले दैनंदिन मनोरंजनाचे कार्यक्रम पुन्हा लवकरच सुरु होतील.

मालिकांच्या निर्मिती संस्थांनी चित्रीकरणाची तयारी सुरु केली आहे. कोविड - १९ चा सामना करत निर्माते काय तयारी करत आहेत ? झी मराठीवरील सर्वांची आवडती मालिका "तुला पाहते रे"  आणि  स्टार प्रवाहवरील "रंग माझा वेगळा" मालिकेचे निर्माते अतुल केतकर यांच्याशी खास संवाद साधला. 

 

 

अतुल केतकर म्हणाले,  चित्रीकरणाला पुःन्हा सुरवात होतेय हि सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे.  पण  कोरोना सारख्या संकटातून बाहेर पडून सर्व नियमांचे पालन करून  पुन्हा नव्याने सुरवात करणे  ही आम्हा सर्वांसाठीच खूप मोठी जबाबदारी आहे.  महाराष्ट्र सरकारने ज्या गाईड लाईन दिल्या आहेत, त्या वेगवेगळ्या संघटनांकडून तसेच डब्लू एच कडून पण ज्या काही सूचना  देण्यात आल्या त्याच देखील पालन केलं जाईल ,  ज्याला SOP (Standard Of Operations ) असं म्हणतात  ज्यात प्रत्येक वाहिनीच्या सुरक्षितेसाठी नियमांची भर केली आहे. ज्यामुळे कोणालाही शूटिंगच्या वेळी कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही. आर्थिक बाबींच्या विचार केला तर ज्या आम्हाला सरकारकडून जे गाईड लाईन्स मिळाल्या आहेत. त्यानुसार  एक तृतीयांश किंवा अर्धा तृतीयांश आम्ही कामासाठी लोकांना बोलवू शकतो पण  हा जो नियम आहे तो कायमचा नसणार आहे,  फक्त  काही दोन किंवा तीन महिने असेल. राज्य सरकारकडून तर मदत मिळतच आहे, घरात बसून राहण्यापेक्षा सरकारच्या नियमांचे पालन करून खचून न जाता कामाला सुरवात करणे गरजेचे आहे. एकंदरीत सर्व निर्मात्यांनी त्यांच्या त्यांच्या  वाहिनीसाठी सरकारकडे मागणी केली आहेच, पण काही सेट असेही आहेत की २ महिने काही काम  झालं  नाही पण तरीदेखील  सेटच भाड भराव लागत आहे . तर ते कस माफ केल जाईल यासाठी देखील राज्यसरकार काम करत आहे. तसेच सरकाने आम्हा सर्वाचं म्हण ऐंकून घेतलं आहे, आणि  त्यानुसार सरकार  आर्थिक बाबींचा देखील विचार करत आहेत. हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. खरतर मालिकांच्या चित्रीकरणाची निश्चित तारीख सांगता येणार  नाही तसेच दोन तीन आठवड्याचे बँकिंग झाल्याशिवाय टेलिकास्ट सुरु होऊ नाही शकणार नाही पण  २० जून ते ३० जूनच्या दरम्यान लवकरच चित्रीकरणाला सुरवात केली जाईल.  

 

आता प्रत्येक  घरा- घरात  मालिकांचा आवाज येणार, मालिकांचं वेळापत्रक पुन्हा सुरु होणार आणि प्रत्येकालाच आवडत्या मालिका बघायची उत्सुकता लागून राहिली असेल यात शंका नाही.

Tags

Read Next...


Featured News

Read something similar