माणुस म्हणुन जन्माला घाल पण कलाकार म्हणुन नको.- मेघा घाडगे

सुशांत सिंग राजपूतच्या घटनेनंतर  सिनेसृष्टीतील प्रत्येकालाच धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येचं कारण म्हणजे त्याच नैराश्य. गेले काही दिवस तो डिप्रेशन मध्ये होता. त्याच्यावर खास उपचार देखील चालू होते. पण नैराश्य माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाऊ शकतो. सुशांतच्या "छिछोरे" या चित्रपटातून दाखवण्यात आलेल्या सकारात्मक विचारांमुळे सुशांत कधी असं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं. 

 

प्रत्येकाच्याच आयुष्यात नैराश्य, विजय - पराजय असतोच पण त्या सगळ्यांतून योग्य मार्ग काढणं हे हि त्याच माणसाच्या हातात असतं. प्रत्येक क्षेत्रात चढ उतार हे येतच असतात पण त्यावर मात करून पुढे निघून जाणं यातच खरा विजय असतो. सुशांतच्या घटनेनंतर प्रत्येकानेच स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या  घटनांबद्दल सोशल मीडियाच्या  माध्यमातून सांगितलं, कोणी कोणी या घटनेवर स्वतःची मत देखील व्यक्त केली. अभिनेत्री लावणी सम्राट "मेघा घाडगे" यांनी त्यांच्या  फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी  स्वतःच्या खडतर आयुष्याचा अनुभव शेअर केला आहे.  मेघा घाडगे यांनी देखील अशा काही संकटांचा सामना करत त्या या यशापर्यंत पोहचल्या.  मेघा घाडगे यांच्या या पोस्टवर त्यांच्या  चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

Tags

Read Next...


Featured News

Read something similar