निसर्ग चक्रीवादळामुळे अभिनेता "देवदत्त नागे" च्या देखील घराचे झाले नुकसान .

३ मार्च रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकण किनारीपट्टीला जास्त बसला आहे. आणि यामुळे कोकणच फार नुकसान देखील झालं आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईला जरी बसला नसला तरी मुंबईजवळील अलिबागपर्यंत त्याचे परिणाम जाणवले. यातून अभिनेता देवदत्त नागे आणि त्याचं घरही सुटलं नाही. देवदत्त नागे आपल्याला जय मल्हार या मालिकेतून माहिती आहेच. त्याने रंगवलेला खंडोबा घराघरांत पोचला. सध्या डॉक्टर डॉनची भूमिका साकारत आहे. 

 

 

एबीपी माझा मराठी वृत्तवाहिनीला मुलखात देत असताना देवदत्त नागे याने  त्याचा अलिबागच्या घराचं झालेल्या नुकसान बद्दल सांगितलं.  देवदत्त नागे मूळचा अलिबागचा आहे. चित्रपट मालिकांचे चित्रीकरण थांबल्या मुळे देवदत्त नागे सुट्टीत अलिबागला गेला होता.  वृत्तवाहिनीने देवदत्तला फोन लावला पण चक्री वादळालामुळे फोनला रेंज नव्हती येत पण थोड्यावेळाने लाईट आल्यावर  फोनवर देवदत्तशी बोलणे झाले, तो म्हणाला , 'वादळ येऊन गेल्यानंतर आमच्या परिसरातले लाईट गेले. आत्ता तब्बल तीन दिवसांनंतर लाईट आले आहेत. या काळात मोबाईलला रेंजनही नव्हती. नंतर आली पण, बॅटरी संपत आली होती. मग आधी लॅपटॉपला फोन लावून, नंतर उरल्या सुरल्या बॅटरीज वापरून फोन चार्ज करत होतो. शेवटी घरासमोरच्या गाड्या सुरू करून आम्ही फोन चार्ज केला. फोन चार्ज झाला तरी रेंज नव्हती. इथे दुसऱ्या दिवसापासून युद्धपातळीवर काम सुरू झालं. म्हणून तीन दिवसांनी लाईट आली.'

 

 

पुढे देवदत्त म्हणतो , सुरूवातीला आम्हाला वाटलं वारं येईल. वादळाची शक्यता होती. त्यामुळे वारं वाढणार याची कल्पना होती. नंतर त्याचा वेग कमालीचा वाढला. झांडं हालू लागली. पानांची फडफट तर धडकी भरवणारी होती. वाऱ्याचा वेग वाढला. तसा पाऊसही. आधी आम्ही ताडपत्री किंवा मिळेल त्याचा आधार घेऊन झाडं वाचवायचा प्रयत्न करू लागलो. पण पाऊस वाढला. वाऱ्याचा वेग तर इतका वाढला की एका पॉईंटनंतर आम्ही सगळे घरी आत सुन्न  बसलो. आता होईल ते होईल हे उमजून चुकलं. नजरेसमोर झाडं तुटली. ती उन्मळून पडली तर पुन्हा लावता येतात. पण अनेक मोठी झाडं तुटली. मधून तुटली. इतकी जुनी वाढलेली मोठी झाडं. या वादळाने तोडली. हे बघत राहण्यापलीकडे पर्याय नव्हता. शेवटी आम्ही गप्प सगळे घरात आलो. लाईट तर नव्हतेच. शेजारच्या झाडाची मोठी फांदी तुटली आणि अगदी शेजारच्या झाडावर पडली. खरंतर ही स्वामी कृपाच म्हणायची. नाहीतर आमच्या घराचंही मोठं नुकसान झालं असतं.'   वाऱ्याचा वेग प्रचंड होताच. झाडं पडत होती. तुटत होती. घराच्या गच्चीवरचे पत्रे उडाले, टाकी तुटली. असं बरंच काही झालंय, देवदत्तच्या घराचं.   

 

पुढे तो म्हणाला,  'टाकी, पत्रे हे आणखी काही दिवसांनी आणता येतील. ते लावता येईल. पण इतकी मोठं वर्षानुवर्षं असणारी झाडं तुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं उद्ध्वस्त झालं होतं. आंब्यांचा खच पडला होता झाडावरून. इतकं वाईट वाटलं. हे आंबे लोकांच्या पोटात गेले असेते तर फार बरं वाटलं असतं पण हे सगळं कल्पनेच्या पलिकडचं होतं. ही अवस्था आमच्या परिसरातल्या प्रत्येक घराची अवस्था आहे. आता यातून पुन्हा सावरायचं आहे.' 

निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग मधली रहिवाशांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Tags

Read Next...


Featured News

Read something similar