सुशांतची बातमी ऐकताच अभिनेता पार्थ भालेराव याने शेअर केला हा व्हिडीओ.

कोरोनाच्या संकटांमुळे सगळीकडेच हाहाकार माजला आहे. त्यात अनेक धक्कादायक घटना घडतच आहेत.  बॉलिवूड सिनेसृष्टीसाठी हे वर्ष खरंतर कधीही न विसरण्यासारखं आहे. बॉलीवूडने या वर्षात एकमोगमाग  कलाकार गमावले.   यापूर्वीच सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार ऋषी कपूर, इमराफ खान यांच्या निधनामुळे सदम्यात असलेल्या बॉलीवूडला आता यंग, डॅशिंग चॉकलेट बॉय अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अचानक घेतलेल्या एक्झिटचे दुःख सोसावे लागत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही बातमी समजताच बॉलीवूडसह त्याच्या चाहत्यांनीही दुःख व्यक्त केले आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतने आपले जीवन संपवणे, हे काही मनाला पटत, अशी भावना सोशल मीडियातून त्याच्या आत्महत्येवर येत आहे. 

 

 

सुशांतच्या अशा अचानक घडलेल्या  घटनेमुळे सोशल मीडियावर भावनिक  पोस्ट  पाहायला मिळत आहे. सुशांत एका नैराश्याखाली जगत होता असं समोर आले आहे. त्याच्यावर स्पेशल डॉक्टरांकडे उपचार सुरू होता.  सुशांतला नैराश्याने ग्रासले होते, व त्याच्यावर मागील सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते, अशी माहिती सध्या समोर आली आहे. सुशांतच्या जाण्यामागे त्याच नैराश्य कारणीभूत होत हेच समोर आले आहे. डिप्रेशनमुळे माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो . सुशांतची बातमी ऐकताच  बॉईज, बॉईज २ आणि गर्ल्स या चित्रपटातील अभिनेता पार्थ भालेराव याने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये पार्थने त्याचा एक अनुभव शेअर केला आहे.

 

  

 

 

 

 

 

मराठी कलाकारांनी देखील सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. सुशांत राजपूतच्या  अशा  अचानक एक्झिटने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.  

 

 

 

 

Tags

Read Next...


Featured News

Read something similar